कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांची पत्नी सोफी यांनी घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली आहे. ट्रुडो यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत यासंबंधीची माहिती दिली आहे. जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटाच्या कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे या दोघांचं १८ वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे जस्टिन ट्र्रुडो यांची पोस्ट?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सोफी आणि मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो की काही अर्थपूर्ण आणि तेवढ्यात कठीण संवादांनंतर आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून एकमेकांसह राहून आमच्या कुटुंबासाठी सर्वतोपरी प्रयत्न कत राहू. आमच्या निर्णयाचा आदर करुन आमच्या आणि आमच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि गोपनियतेचा आदर करावा, ही अपेक्षा. या आशयाची पोस्ट ट्रुडो यांनी लिहिली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटलं आहे की, “ट्रुडो आणि सोफी यांनी वेगळं होण्याच्या निर्णयासंदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.” जस्टिन ट्रुडो हे ५१ वर्षांचे आहेत तर सोफी ४८ वर्षांच्या आहेत. २००५ मध्ये जस्टिन ट्रुडो आणि सोफी यांचं लग्न झालं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत.

जस्टिन ट्रुडो २०१५ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. वोगो मासिकातही त्यांचं स्थान पटकावलं होतं. ट्रुडो आणि सोफी जेव्हा पहिल्यांदा डेटवर गेले तेव्हा म्हणाले होते की ३१ वर्षांचा आहे आणि मी तुझी ३१ वर्षे वाट पाहिली आहे. त्यांनी एका मासिकाला मुलाखत देताना हा किस्सा सांगितला होता. २०१४ मध्ये ट्रुडो यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्यात ते असं म्हणाले होते की आमचं लग्न कधीच परिपूर्ण नव्हतं. त्यात बरेच चढ-उतार आले. तरीही सोफी माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada pm justin trudeau and wife sophie to split after 18 years of marriage scj