Canada PM Justin Trudeau Expected to Announce Resignation : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त द ग्लबल अँड मेलच्या वृत्ताचा हवाला देत रॉयटर्सने दिला आहे. ते सोमवारी म्हणजे आजच त्यांच्या राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
कॅनडामध्ये बुधवारी राष्ट्रीय कॉकस बैठक होणार आहे. या बैठकीआधीच ते राजीनामा जाहीर करतील. परंतु, त्यांच्या राजीनाम्याची वेळ निश्चिक समजू शकलेली नाही. ट्रूडो ताबडतोब राजीनामा देतील की नवीन नेत्याची निवड होईपर्यंत पंतप्रधानपदी कायम राहतील हे देखील स्पष्ट नाही.
कॅनडात निवडणुकीची मागणी
जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा दिल्यास तिथे लवकरच निवडणुका घेण्याची मागणी होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांच्याशी चर्चा केली आहे. अंतरिम नेता आणि पंतप्रधानपद स्वीकारण्याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे.अहवालात पुढे म्हटले आहे की जर लेब्लँक यांनी निवडणूक लढवण्यास सकारात्मकता दाखवली तर ते अकार्यक्षण आहेत.
हेही वाचा >> HMPV Virus India : भारतात आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, करोनानंतर आता नव्या साथीची भीती?
ट्रूडो हे २०१३ पासून लिबरल पक्षाचे नेतृत्व करत आहेत. तेव्हा पक्ष संघर्ष करत होता. तेव्हा इतिहासात प्रथमच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तिसऱ्या स्थानावर घसरला होता.
अमेरिकेशी चर्चा
निवडणुकीच्या आधी झालेल्या सर्वेक्षणातून त्यांचा पक्ष हरणार असल्याचं स्पष्ट होत असल्याने ते राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ट्रुडो यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीतून त्यांनी अमेरिकेशी असलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना खास प्रतिक्रिया दिली नाही.
भारतावर आरोप
ट्रुडो सरकारचे भारताबरोबरचेही संबंध बिघडले आहेत. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येनंतर ट्रुडो सरकारने भारतावर आरोप केला होता. या आरोपांवर भारतानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. या प्रकरणामुळे कॅनाडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारताने परत पाठवलं होतं, तर कॅनडानेही भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतात पाठवलं होतं.