भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॅनडातील विनिपेग शहरातील एका रस्त्याला राष्ट्रपिता म. गांधीजींचे नाव देण्यात आले आहे. ‘कॅनडियन म्युझियम फॉर ह्य़ूमन राइट्स’कडे जाणाऱ्या मार्गाचे आता ‘ऑनररी महात्मा गांधी वे’ असे नामकरण करण्यात आले आहे.
नामकरण समारंभात विनिपेगचे महापौर सॅम कॅट्झ यांनी म्युझियमकडे जाणाऱ्या रस्त्याला म. गांधीजींचे नाव देण्याचे जोरदार समर्थन केले. ज्या महापुरुषाने आयुष्यभर मानवी हक्कांसाठी लढा दिला त्याचे नाव रस्त्याला देणे उचितच आहे, असे महापौर म्हणाले.
मल्लिका शेरावतविरोधातील खटल्यास स्थगिती
पीटीआय, नवी दिल्ली
एका हॉटेलात सात वर्षांपूर्वी केलेल्या अश्लील नृत्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला न्यायालयात पाचारण करण्यासंबंधी बडोदा न्यायालयाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. सदर नृत्य अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आले होते.बडोदा न्यायालयाने याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा दिलासा न दिल्यामुळे मल्लिका हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्या. बी.एस. चौहान यांनी हा आदेश जारी केला.
कॅनडात रस्त्याला गांधीजींचे नाव
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॅनडातील विनिपेग शहरातील एका रस्त्याला राष्ट्रपिता म. गांधीजींचे नाव देण्यात आले आहे.
First published on: 17-08-2013 at 03:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canadian city names street after mahatma gandhi