Canadian MP Chandra Arya : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील अल्पसंख्यक समुदायावर म्हणजे हिंदू, बौद्ध व ख्रिश्चनांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांबाबत भारतासह जगातील काही देशांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, आता कॅनडातील एका भारतीय वंशाच्या खासदानेही याबाबत भाष्य केलं आहे. ज्यावेळी बांग्लादेश अस्थिर होतो, त्यावेळी तेथील हिंदू, बौद्ध व ख्रिश्चनांवर हल्ले होतात, असे ते म्हणाले. तसेच या हल्ल्यांमुळे कॅनडातील बांगलादेशी नागरिकही चिंतेत असून ते लवकरच निर्देशने करतील, असेही त्यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले चंद्रा आर्या?

कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी सोमवारी संसदेत बोलताना बांगलादेशमधील परिस्थितीबाबत भाष्य केलं. बांगलादेशमधील परिस्थिती चिंताजनक आहे. कॅनडातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरिकांनाही आता बांगलादेशमधील त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या संपत्तीची काळजी वाटू लागली आहे, असे ते म्हणाले. तसेच या परिस्थितीकडे कॅनडा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही २३ सप्टेंबर रोजी संसदेसमोर निर्देशने करणार आहोत. या आंदोलनात कॅनडातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितलं.

Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
justin trudeau accepts Khalistani supporters in Canada
Canadian PM Justin Trudeau: सर्वच हिंदू मोदी समर्थक नाहीत, कॅनडाच्या पंतप्रधानांची टीका; म्हणाले “आमच्याकडे खलिस्तानी…”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!

हेही वाचा – Bangladesh : बांगलादेशी नेत्याचा ममता बॅनर्जींना अजब सल्ला; म्हणाला, “पश्चिम बंगालला मोदी सरकारपासून स्वतंत्र घोषित करा”

पुढे बोलताना, बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांसह अन्य अल्पसंख्याकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. खरं तर बांगलादेश जेव्हा जेव्हा अस्थिर होतो, तेव्हा तेव्हा तेथील हिंदू हिंदू, बौद्ध व ख्रिश्चनांवर हल्ले वाढतात, असंही त्यांनी नमूद केलं. तसेच १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून तेथील अल्पसंख्यकांची संख्या कमी झाली, असेही ते म्हणाले.

सत्तापालटानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार

दरम्यान, बांगलादेशात नुकताच झालेल्या सत्तापालटानंतर देशभरात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यादरम्यान बांगलादेशातील हिंदूंसह अन्य अल्पसंख्यक समाजाच्या नागरिकांवर हल्ले करण्यात येत आहे. याशिवाय अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.

हेही वाचा – Bangladesh Durga Puja Festival: ‘नमाजच्या पाच मिनीट आधी पूजेसाठीचे स्पीकर बंद करा’, बांग्लादेशच्या गृह मंत्रालयाचे निर्देश

कोण आहेत चंद्रा आर्या?

चंद्र आर्या हे कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार असून ते मूळ कर्नाटकचे आहेत. दोन वर्षांपूर्वी कॅनडाच्या संसदेत त्यांनी कन्नड भाषेत केलेलं भाषण चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. चंद्रा आर्या हे कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑन्टारियोमधील नेपियन जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.