Canadian Official Counteroffer to Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे ५१वे राज्य बनवण्याबद्दल केलेल्या विधानानंतर आता कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला प्रत्युत्तर दिले आहे. कॅनडातील या अधिकाऱ्याने ट्रम्प यांना उलट दोन अमेरिकन स्टेट विकत घेण्याची ऑफर दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्याकडून कॅनडावर टीका केली जात आहे. तसेच ट्रम्प यांनी कॅनडाला युनायटेड स्टेट्समधील ५१ वे राज्य बनवण्यासाठी आर्थिक शक्ती वापरण्याची धमकी देखील दिली आहे. यादरम्यान सोमवारी ओंटारियो प्रेमियर डग फोर्ड (Ontario Premier Doug Ford) यांनी ट्रम्प यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना फोर्ड यांना ट्रम्प यांनी कॅनडाचे विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर फोर्ड म्हणाले की, “अध्यक्षांना, मी एक काउंटर ऑफर करीन. जर आम्ही अलास्का विकत घेतलं तर कसं राहिल? आणि आम्ही यामध्ये मिनेसोटा आणि मिनियापोलिसचाही समावेश करू?”.

ते पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे की हे वास्तवाला धरून नाही. मला माहिती आहे की अशी वक्तव्य करणे आणि विनोद करणे त्यांना आवडे, मी हे गांभीर्याने घेतो. ते कदाचित विनोद करत असतील, पण माझ्या निगराणीखाली हे होणे कधीही शक्य नाही”, असेही फोर्ड म्हणाले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी तेथील सत्तारूढ पक्षाच्या प्रमुखपदाचा आणि पर्यायाने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. गेले काही महिने ट्रुडोंना पक्षातूनच प्रखर विरोध होत होता. दरम्यान ट्रूडो यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल पोस्ट करत कॅनडाच्या विलनीकरणबाबत वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा>> मुकेश अंबानी ते डीमार्टचे संस्थापक…जानेवारी २०२५ मध्ये ‘हे’ आहेत देशातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा यादी

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले होते की, “कॅनडातील बऱ्याच लोकांना ५१वे राज्य बनायला आवडेल. कॅनडाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक मोठ्या प्रमाणातील व्यापारी तूट आणि अनुदाने यापुढे युनायटेड स्टेट्‍स सहन करू शकत नाही. जस्टिन ट्रुडो यांना हे माहित होते आणि त्यांनी राजीनामा दिला. जर कॅनडाचे अमेरिकेत विलीनीकरण झाले तर तेथे कोणतेही शुल्क नसतील, कर मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि ते रशियन आणि चिनी जहाजांच्या धोक्यापासून पूर्णपणे सुरक्षित असतील. एकत्र आल्यानंतर ते किती महान राष्ट्र बनले”.

कॅनडाला शरण आणण्यासाठी ते लष्करी शक्ती वापरतील का असा प्रश्नही ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी यासाठी आपण ‘आर्थिक शक्ती’ वापरणार असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी दुसर्‍या एका पोस्टमध्ये कॅनडाला युनायटेड स्टेट्‍सचा भाग असल्याचे दाखवणारा नकाशा पोस्ट केला. या पोस्टला त्यांनी “ओह कॅनडा!” असं कॅप्शन दिलं.