खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आरोप केला होता. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचा अहवाल आता कॅनडाच्या आयोगाच्या अहवालातून समोर आलं आहे. निज्जरच्या हत्येमध्ये परकीय राज्याशी कोणताही निश्चित संबंध नसल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये ट्रूडो यांनी दावा केला होता की कॅनडाकडे भारताविरोधात विश्वासार्ह पुरावे आहेत. ब्रिटिश कोलंबियामध्ये निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट सामील होते, असे पुरावे असल्याचा दावा कॅनडाने केला होता. तथापि, मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या फेडरल इलेक्टोरल प्रोसेसेस अँड डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्समध्ये परकीय हस्तक्षेपाची पब्लिक इन्क्वायरी इनटू फॉरेन इंटरफेरन्सी या शीर्षकाच्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की, ट्रुडोच्या दाव्यांनंतर भारताने चुकीची माहिती पसरवली असली तरी, हत्येशी कोणताही परदेशी संबंध स्पष्ट झालेला नाही.

१२३ पानांच्या अहवालात कॅनडातील भारतीय मुत्सद्दींची हकालपट्टी कऱण्यात आली होती, याचाही उल्लेक आहे. याच्या प्रत्यूत्तरात भारतीयांनीही कॅनडाच्या सहा मुत्सद्यांची हकालपट्टी करून आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावलं होतं. ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले. या आरोपांना दिल्लीतूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. कॅनडातील खलिस्तान समर्थक घटकांना सहन करत असल्याबद्दल भारताने ट्रुडो सरकारवर सातत्याने टीका केली आहे. खलिस्तान चळवळीवर भारतात बंदी असताना कॅनडातील शीख डायस्पोरामधील वर्गांचा त्याला पाठिंबा आहे.

चार भारतीयांना जामीन

खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना कॅनडातील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. करण ब्रार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग या चार आरोपी भारतीय नागरिकांवर फर्स्ट डिग्री खून आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 

हरदीप सिंग निज्जर कोण होता?

निज्जर कॅनडाच्या सरे शहरात राहत होता. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिम कॅनेडियन प्रांतातील हे सर्वात मोठे शहर आहे. १९९७ साली त्याने पंजाबहून कॅनडात बस्तान हलवले. सुरुवातीला कॅनडामध्ये प्लम्बरचे काम केल्यानंतर निज्जर कॅनडामध्येच लग्न करून स्थायिक झाला, त्याला दोन मुले आहेत. २०२० सालापासून तो सरे शहरातील गुरुद्वाराचा प्रमुख होता. निज्जरचे मूळ पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील फिल्लोर तालुक्यातील भर सिंग पुरा या गावात आहे. करोना महामारीच्या पहिल्या लाटेपूर्वी निज्जरचे पालक या गावात येऊन गेले होते, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

Story img Loader