Job Application : नोकरीचा शोध घेत असताना बरेच जण त्यांना अवगत असलेली कौशल्य त्यांच्या सीव्हीमध्ये लिहितात. पण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या खास कौशल्यामुळे त्याने नोकरीची संधी गमावल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे.

गुगल, अॅप्पल आणि ट्विटर सारख्या जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर राहिलेल्या एका व्यक्तीने केलेल्या आपल्या पोस्टमध्ये यासंबंधी अनुभव शेअर केला आहे. ज्यामध्ये एका उमेदवारांने सीव्हीमध्ये तो गिटार वादक आणि मॅरेथॉन धावपट्टू असल्याचा उल्लेख केल्याने त्याला नोकरी देण्यात आली नव्हती.

zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Binil and Jain were among the several Indian youths who had travelled to Russia
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; अनेक महिन्यांपासून मायदेशी पाठवण्याची विनवणी केली, पण…
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण

परमिंदर सिंग जे सध्या टाटलर एशिया (Tatler Asia) मध्ये चीफ ऑपरेटींग ऑफिसर (COO) म्हणून काम करत आहेत, त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्यांच्याकडे एका नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराचा अर्ज आला होता. मार्केटींगमधील नोकरीसाठी अर्ज करणारा हा उमेदवार आवश्यक सर्व गरजा पूर्ण करत होता, पण तो इतरही स्वत:च्या इतरही काही आवडी जोपासत होता. यामुळे त्यांच्या बॉसने त्या उमेदवाराचा अर्ज नाकारला.

सिंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं की, मार्केटिंगच्या नोकरीसाठी योग्य असूनही त्यांना त्या उमेदवाराला निवडू नये असे सांगण्यात आलं होतं. यामागचं कारण काय? तर उमेदवार मॅरेथॉन धावपटू आणि गिटार वादक असल्याचं त्यांच्या बॉसला आवडलं नाही. या छंदामुळे तो वेळेवर कामाची असाइनमेंट पूर्ण करेल की नाही असा प्रश्न त्याला पडला.

” सक्षम मार्केटर असूनदेखील, त्याच्या सीव्हीमध्ये तो मॅरेथॉन धावतो आणि गिटार वाजवतो असं दिलेलं होतं. ज्यामुळं माझ्या बॉसने मला त्याला कामावर घेऊ दिले नाही”, असे सिंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमकं त्यांच्या बॉसने काय म्हटलं हे देखील सिंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलें आहे. “हा व्यक्ती इतकं सगळं करतो तर मग हा काम कधी करणार? (ये आदमी ये सब कुछ करता है तो काम कब करेगा?)”.

सिंग यांनी केलेल्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. लोक भारतातील नोकरी देणाऱ्या कंपन्यांची मानसिकता कशी असते याबद्दल भरभरून कमेंट करत आहेत.

हेही वाचा>> PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा …

“मी त्याला कामावर घेऊ शकले नाही आणि मला याचं वाईट वाटतं. हे खूप वर्षांपूर्वी घडलं. मी भारतापासून दूर आहे आणि येथील परिस्थिती बददली असेल अशी आशा व्यक्त करतो, पण तसं झालं नाही असं दिसतंय. मी गुगलमध्ये होतो त्याच्याशी याची तुलना केली तर तेथे अलिखित धोरण होतं की तुम्ही जर ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली असेल तर तुम्ही थेट गुगल ऑफिसममध्ये जाऊन नोकरी मिळवू शकता. एक्सलंन्स हे ट्रान्सफर करता येणारं कौशल्य आहे”, असेही सिंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Story img Loader