Captain Deepak Singh : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीच देशाला हळहळ वाटणारी बातमी समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि तयारी सुरु असतानाच जम्मू काश्मीरच्या दोडा या ठिकाणी दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन दीपक ( Captain Deepak Singh ) सिंग यांना वीरमरण आलं आहे. सैन्य दलाच्या पथकाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र कॅप्टन दीपक सिंग ( Captain Deepak Singh ) यांच्या रुपाने भारतमातेने आपला सुपुत्र गमावला.

जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादाविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलवली. या दरम्यान जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याच्या ४८ राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक सिंग ( Captain Deepak Singh ) शहीद झाले. भारतीय सैन्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हे पण वाचा- दहशतवादी हल्ला उधळला; कुपवाड्यात जवान शहीद, चार सैनिक जखमी

भारतीय सैन्याचे जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केलं मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पटनी टॉप जंगलातील अकर क्षेत्रातील एका नदी किनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. बुधवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात येत असलेल्या जागेवर आपली शस्त्रं टाकून दहशतवाद्यांनी पळ काढला. घटनास्थळावरुन अमेरिका एम ४ रायफलही जप्त करण्यात आली असून तीन बॅगेतून स्फोटकेही जप्त करण्यात आली. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली दहशवाद्यांच्या घटनांवरुन बैठका सुरू असून गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुप्तचर माहितीचा हवाला देऊन एका सूत्रानं सांगितलं की, “जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.