सज्जाद अहमद या जिवंत ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याचा काश्मीरातील रफियाबाद येथे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तळ उभारण्याचा मनसुबा होता. यासोबतच हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेतून हाकलून देण्यात आलेल्या कय्युम नाझरचा या परिसरातील दबदबा कमी करण्याचीही कामगिरी सज्जादवर सोपविण्यात आली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीदरम्यान समोर आली आहे.
बारामुल्ला जिल्ह्य़ातील रफियाबाद येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जिवंत पकडण्यात आलेल्या सज्जाद अहमद या दहशतवाद्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. यात समोर आलेल्या माहितीनुसार, सज्जाद २०१२ साली लष्कर-ए-तोयबा संघटनेत सामील झाला. त्याआधी सज्जादने दोन वेळा पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सीमारेषेवर मोठ्या प्रमाणावर लष्करी बंदोबस्त असल्यामुळे त्याला यश आले नाही. सज्जादचे केवळ चौथी पर्यंतचे शिक्षण झाले असून तो पाकिस्तानच्या नैर्ऋत्येकडील मुझफ्फरगडचा आहे. लष्कर-ए-तोयबात सामील होण्याआधी जमाद-उद-दवा या हाफिज सईदच्या संघटनेसाठी देखील सज्जाद काम करीत होता. तेथेच त्याला दहशतवादी कारवाया करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा