मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात पोलिसांना अत्यंत महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. दिव्या पाहुजाच्या हत्येनंतर ज्या BMW कारमधून तिचा मृतदेह नेण्यात आला ती कार पोलिसांनी पंजाबमधून ताब्यात घेतली आहे. २ जानेवारी या दिवशी दिव्या पाहुजा या मॉडेलची गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यानुसार तिचा मृतदेह एका कारमध्ये ठेवून तो विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आला होता. ही कार आता पोलिसांना सापडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळेच पोलिसांनी हत्येचा मास्टरमाईंडसह तिघांना अटक केली आहे. असं असलं तरीही दिव्या पाहुजाचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?

मंगळवारी गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये दिव्या पाहुजाला पाच लोक घेऊन गेले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दिव्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे ती कथित रुपाने हॉटेल मालकाला अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करत होती. हॉटेलचं जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्यात मंगळवारी म्हणजेच २ जानेवारीच्या रात्री १०.४५ ला दोन लोक दिव्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेऊन जाताना दिसत आहेत. हा मृतदेह निळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर तो विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पंजाबच्या पटियाला बस स्थानकावर मिळाली कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्याकांडातला मुख्य आरोपी अभिजित सिंह याने हॉटेलपासून एक किमी अंतरावर असलेल्या एका जागी बलराज उर्फ हेमराजला BMW कार दिली होती. ही कार आता पंजबाच्या पटियाला बस स्थानकाजवळ पोलिसांना मिळाली आहे. ही कार म्हणजे हत्या प्रकरणातला एक मोठा पुरावा ठरु शकतो असा पोलिसांचा कयास आहे. कार मिळाली असली तरीही त्यात दिव्या पाहुजाचा मृतदेह नव्हता. पोलीस आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. त्यांनी मृतदेह कुठे फेकला याबाबत त्यांची चौकशी केली जाते आहे.

हे पण वाचा- गँगस्टर, गर्लफ्रेंड आणि हत्या.. मारेकऱ्याला अटक करुनही मॉडेल दिव्या पाहुजाच्या मृत्यूचं गूढ कायम

गँगस्टर संदीप गाडोलीची दिव्या पाहुजा ही गर्लफ्रेंड होती. ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी गँगस्टर संदीप गाडोलीचं एनकाऊंटर झालं. त्यावेळी दिव्या त्याच्याबरोबर तिथे होती. हे एनकाऊंटर मुंबईत झालं असलं तरी ते हरियाणा पोलिसांनी केलं होतं. एनकाऊंटरनंतर दिव्या पाहुजा या प्रकरणातली माफीची साक्षीदार झाली. मात्र दिव्यावर तिच्या बॉयफ्रेंडने म्हणजेच संदीप गाडोलीने पोलिसांची माहितगार असल्याचा आरोप त्याच्या एनकाऊंटरच्या आधी केला होता. त्याच्या या आरोपांमुळेच तिच्या अडचणी वाढल्या अशीही चर्चा आता होते आहे.