नव्या पोपच्या निवडीपूर्वी व्हॅटिकन सिटीतील सदोष कार्यपद्धतीबाबतची माहिती जाणून घेण्याची इच्छा कार्डिनलनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोपशी संबंधित दस्तऐवज फुटल्याच्या प्रकाराची गडद छाया पोप निवडीच्या बैठकीवर पडली असून पोपपदी कोणाची निवड होईल याबाबत कोणतीही अटकळ बांधता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पोप निवडीच्या बैठकीला मतदानासाठी पात्र असलेल्या ११५ कार्डिनलपैकी १०३ जण हजर होते. त्यांनी कार्डिनलनी निवडणूक प्रक्रिया निश्चित केली आणि चर्चला भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा केली आणि मतदानापूर्वी एकमेकांची ओळख करून घेतली.
पोप यांच्या खानसाम्यावर दस्तऐवज चोरून पत्रकारांना दिल्याचा आरोप असला तरी त्याला पोपकडून माफ करण्यात आले आहे. नव्या पोपच्या निवडीसाठी होणाऱ्या बैठकीचा दिवस अद्याप निश्चित झालेला नाही आणि आणखी काही दिवसांत तो निश्चित होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सर्व कार्डिनल येईपर्यंत हा दिवस निश्चित केला जाणार नाही. मतदानास पात्र असलेले १२ कार्डिनल अद्याप रोमच्या वाटेवर आहेत तर अन्य काही जण सोमवारनंतर येणार आहेत. साधारणपणे ११ मार्चपर्यंत ही बैठक होईल, असे संकेत मिळत असून नव्या पोपची नियुक्ती १७ मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे.

Story img Loader