फ्रान्सच्या शार्ली हेब्दो या टीकात्मक साप्ताहिकासमोर आता नवी समस्या उभी राहिली असून, व्यंगचित्रकार दहशतवादी हल्ल्यामुळे भावनिक ओझ्यामुळे नोकरी सोडून चालले आहेत. कारण त्यांचे सहकारी अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. शार्ली हेब्दोला जगभरातून देणग्या आल्या असून, त्याचा वापर कसा करावा याबाबतही मतभेद झाले आहेत. १७ जानेवारीच्या हल्ल्यात १२ जण मारले गेले होते. त्यानंतरच्या पहिल्या अंकासाठी व्यंगचित्र काढणारे रेनाल्ड लुझियर यांनी ‘डेली लिबरेशन’ या वृत्तपत्राला दिलेल मुलाखतीत सांगितले, की प्रत्येक अंक हा छळवणूक करणारा ठरत आहे कारण इतर कुणीच आता इथे नाही, त्यामुळे आपण सप्टेंबरमध्ये नोकरी सोडत आहोत.
दरम्यान, शार्ली हेब्दोच्या वादग्रस्त चित्रांबद्दल टीकाही झाली होती. या साप्ताहिकाला जानेवारीतील हल्ल्यानंतर ४३ लाख युरो देणगीतून मिळाले होते, त्याचा वापर कसा करायचा यावर मतभेद झाल्याने आता या निधीच्या विनियोगासाठी आयोग नेमण्यात येत आहे. शार्ली हेब्दोने जानेवारीत महंमद पैगंबरांची वादग्रस्त व्यंगचित्रे काढल्यानंतर इस्लामी अतिरेक्यांनी साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला केला होता.

Story img Loader