आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या कारणावरून स्थानिक न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिल भारतीय जनसेवा समितीचे अध्यक्ष नदीम कुरेशी यांच्य तक्रारीनुसार कुमार विश्वास यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. कुरेशी यांनी केलल्या आरोपानुसार, कुमार विश्वास यांनी विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी रचलेल्या कवितांमध्ये धार्मिक भावना दुखावणारे शब्द होते. त्यांच्या वक्तव्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच त्यांचे वक्तव्य देशात धार्मिक दुफळी निर्माण करणारे आहे.
या कारणावरून नदीम कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कुमार विश्वास यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. आता या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Story img Loader