हैदराबादमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाभाजप आमदार रघूनंदर राव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी या बलात्कार प्रकरणाशी संबंधित काही व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध करत या घटनेत एमआयएम पक्षाच्या आमदाराच्या मुलाचा समावेश असल्याचा दावा केला होता.

हेही वाचा >>> “आप सरकार पंजाबमध्ये…”; राहुल गांधी यांनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट

पिडित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर या प्रकरणाशी निगडीत काही फोटो आणि व्हिडीओ भाजपा आमदार रघूनंदन राव यांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात हैदराबादमधील अबिड्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम २२८ ए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा >>> पाकिस्तानचा ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला करण्याचा कट; सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करत उधळला डाव

“हैदराबाद येथील जुबली हील्स येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित भाजपा आमदार रघूनंदन राव यांनी काही व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामुळे पीडित मुलीची ओळख सार्वजनिक झाली. एकीकडे तपास सुरु असताना भाजपा आमदार यामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे उघड होत आहे. असे केल्यामुळे पीडितेच्या चारित्र्याचे हनन होत आहे,” अशी नोंद एफआरआयमध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> हत्या आणि बलात्काराच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर नुपूर शर्माच्या संपूर्ण कुटुंबाला दिल्ली पोलिसांनी पुरवली सुरक्षा

नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार २८ मे रोजी पीडित तरुणी हैदराबादमध्ये एका पबमध्ये गेली होती. येथे ती आपल्या मित्राला भेटली. त्यानंतर या मित्राने घरी सोडण्याचे आश्वासन दिल्यामुळे पीडित मुलगी आपला मित्र आणि इतर काही मुलांसोबत मर्सिडिज कारमध्ये बसून गेली. त्यानंतर या मुलीला इनोव्हा कारमध्येनिर्जन स्थळी नेण्यात आले. येथे कारमध्ये मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.

Story img Loader