एखाद्या मोठ्या कंपनीचे नाव हे त्या कंपनीसाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यातही एअरलाईन कंपनीचे नाव असेल तर त्याच्या ब्रॅंडवरुन त्याची ओळख निर्माण झालेली असते. विमानावरही हे नाव लिहीलेले असते. पण या नावाचे स्पेलिंगच चुकीचे लिहीलेले असेल तर? हो हे वाचून तुम्हाला काहीसे चुकीचे वाटत असले तरीही ते प्रत्यक्षात घडले आहे. एका नामांकीत एअरलाईन कंपनीने आपल्या विमानावर चुकीचे नाव छापले. हाँगकाँगमधील कॅथे पॅसिफीक (Cathye Pacific) या कंपनीकडून ही चूक झाली आहे. हाँगकाँग विमानतळावर एका प्रवाशाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर त्याने ती एअरलाईन कंपनीच्या लक्षातही आणून दिली.
Oops this special livery won’t last long! She’s going back to the shop!
(Source: HKADB) pic.twitter.com/20SRQpKXET— Cathay Pacific (@cathaypacific) September 19, 2018
या विमानावर Cathye Pacific ऐवजी Cathye Paciic असे लिहीण्यात आले होते. यामध्ये f हे अक्षर लिहायचे राहीले होते. विशेष म्हणजे कंपनीने आपली ही चूक झाकून नेण्यासाठी एक गमतीशीर ट्विट केले आहे. विमानाचा हा स्पेशल पोषाख फार काळ टीकणार नाही, तर तो पुन्हा एकदा आपल्या दुकानात जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र या चुकीबाबत कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही असे सांगत आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र हे विमान उड्डाणासाठी तयार होते, त्यामुळे इतकी मोठी चूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही का असा प्रश्नही त्यांना अनेकांनी विचारला आहे.