कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी पाणीप्रश्नावर वाद असून त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तटस्थपणे निर्णय घेतील, असा विश्वास तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी व्यक्त केला आहे.
कावेरी व्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी आपण केली आहे. मात्र त्याबाबत निर्णय घेण्यासाठी भाजप सरकारला वेळ देणे योग्य ठरेल, असेही जयललिता म्हणाल्या.
कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करावे, अशी तामिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांची धारणा आहे. त्यामुळे याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी ही द्रमुक नेते एम. करुणानिधी यांनी केलेल्या मागणीची गरजच नाही, असेही त्या म्हणाल्या.कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारसमोर नाही, असे केंद्रीय खते आणि रसायनेमंत्री अनंतकुमार यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते.