कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणींच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी सीबीआयने महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत मोंडल यांना अटक केली आहे. दोघांनी साक्ष आणि पुराव्याशी छेडछाड तसेच तपास भरकटवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, माजी प्राचार्य संदीप घोष यांना सीबीआयने २ सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांना आता डॉक्टर तरुणींच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणीही अटक करण्यात आली आहे. तर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित मोंडल यांना शनिवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. सात तासांच्या चौकशीनंतर त्यांनाही पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. दोघांनाही रात्री उशीरा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी सीबीआयने याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय यालाही अटक केली आहे.

हेही वाचा – Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींवर टाकला बहिष्कार; म्हणाले, “इथून पुढे मी त्यांच्याबरोबर…”!

सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित मोंडल यांना शनिवारी चौकशीसाठी बोलवल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. या प्राथमिक तपासात त्यांनी पुराव्याशी छेडछाड केल्याचं तसेच गुन्हा नोंदवून घेण्यास विलंब केल्याचं आढळून आलं. याशिवाय याप्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्याचीही चौकशी केली जात होती. त्यांनीही पुराव्याशी छेडछाड केल्याचं आढळून आलं.

हेही वाचा – Mamata Banerjee : “मला खुर्ची नको, राजीनामा द्यायला तयार”, आंदोलक डॉक्टरांनी चर्चेस नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जींचं वक्तव्य

याप्रकरणी दोघांनाही रात्री उशीरा अटक करण्यात आली. तसेच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना आज सियालदाह येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. खरं तर ९ ऑगस्ट रोजी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातो आहे. तसेच दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी डॉक्टरांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी कोलकाताचे पोलीस आयुक्त विनित गोयल यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi arrests rg kar ex principal and psi for tampering of evidence spb