चेन्नईतील आपल्या निवासस्थानासाठी उच्चक्षमतेच्या ३०० दूरध्वनी जोडण्या लावून त्यापैकी काही जोडण्यांचा वापर आपल्या भावाच्या वाहिनीसाठी केल्याच्या आरोपावरून सीबीआयने मंगळवारी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता त्यामधून मारन आणि अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करण्याइतपत पुरेसा पुरावा मिळाल्याने एफआयआर नोंदविण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. बीएसएनएलचे तत्कालीन मुख्य महाव्यवस्थापक के. ब्रह्मनाथन आणि खासदार वेलूस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मारन यांचे बोट हाऊस निवासस्थान आणि सन टीव्हीचे कार्यालय यांना समर्पित वाहिनीद्वारे ३२३ दूरध्वनी जोडण्या देण्यात आल्या होत्या .