आयपीएलच्या सामन्यांमध्ये अंदाजे ६६ हजार कोटी रुपयांची प्रचंड सट्टेबाजी झालेली असताना त्यास कायदेशीर अधिष्ठान देण्यात काहीही गैर नाही आणि त्यावर बंदीही घालता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक रणजित सिन्हा यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद उत्पन्न होण्याची चिन्हे आहेत.‘क्रीडा क्षेत्रातील नैतिकता आणि सभ्यता-कायद्याची गरज आणि सीबीआयची भूमिका’ या विषयावरील एका चर्चासत्रात ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्नांना सिन्हा उत्तरे देत होते. तुम्ही सट्टेबाजीवर बंदी घालू शकत नाही हे म्हणणे म्हणजे तुम्ही बलात्कारांना रोखू शकत नसाल तर त्याची मजा घ्या, असे म्हणण्यासारखेच आहे, अशी मुक्ताफळे सिन्हा यांनी उधळली. आज राज्यांमध्ये लॉटऱ्या आहेत, रिसॉर्ट्समध्ये कॅसिनो आहेत, स्वेच्छेने काळा पैसा उघड करण्यासाठी आम्ही संबंधितांना उत्तेजन देतो, मग असे असताना सट्टेबाजीला कायदेशीर अधिष्ठान देण्यात अडचण काय आहे, असे विचारून त्या व्यवहारांमध्ये ‘लक्ष’ घालण्यासाठी तुमच्याकडे गुप्तचर संस्था आहेतच, असेही शर्मा यांनी सांगितले. (सट्टेबाजी कायदेशीर करण्यासंबंधी विचारण्यात आलेल्या मतावर शर्मा यांनी हे उत्तर दिल्याचा खुलासा सीबीआयच्या प्रवक्त्याने नंतर केला.)

Story img Loader