पीटीआय, नवी दिल्ली

नोकऱ्यांसाठी जमिनी घोटाळा प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य ७७ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या विविध विभागांमध्ये अपात्र उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या मोबदल्यात त्यांच्या कुटुंबीयांनी कथितरित्या जमिनी मिळवल्याचा आरोप आहे.

nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Reserve Bank application for Aviom bankruptcy proceedings
‘एव्हिओम’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी रिझर्व्ह बँकेचा अर्ज
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
Manisha Achadaye issued notice to contractor over stalled sports complex work in VTC ground
महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराला नोटीस, बदल्यांच्या निर्णयालाही स्थगिती
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!

या घोटाळ्याचा तपास केल्यानंतर सीबीआयने विशेष न्यायाधीशांसमोर तिसरे आणि अखेरचे आरोपपत्र ठेवले. या ७८ आरोपींमध्ये लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजप्रताप यादव, मुलगी हेमा यादव, माजी ओएसडी भोला यादव आणि लालूप्रसाद यादव यांचे माजी कर्मचारी यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी तेजप्रताप यादव याच्याविरोधात पहिल्यांदाच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>महादेव जानकरांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, पण त्यांच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही लोटपोट हसाल!

या यादीत एकूण २९ रेल्वे अधिकारी, ३९ उमेदवार आणि सहा अन्य व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांविरोधात फसवणूक आणि खोट्या सह्या करण्यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेसाठी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रेही सादर केली होती.

Story img Loader