पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नोकऱ्यांसाठी जमिनी घोटाळा प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य ७७ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या विविध विभागांमध्ये अपात्र उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या मोबदल्यात त्यांच्या कुटुंबीयांनी कथितरित्या जमिनी मिळवल्याचा आरोप आहे.
या घोटाळ्याचा तपास केल्यानंतर सीबीआयने विशेष न्यायाधीशांसमोर तिसरे आणि अखेरचे आरोपपत्र ठेवले. या ७८ आरोपींमध्ये लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजप्रताप यादव, मुलगी हेमा यादव, माजी ओएसडी भोला यादव आणि लालूप्रसाद यादव यांचे माजी कर्मचारी यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी तेजप्रताप यादव याच्याविरोधात पहिल्यांदाच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या यादीत एकूण २९ रेल्वे अधिकारी, ३९ उमेदवार आणि सहा अन्य व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांविरोधात फसवणूक आणि खोट्या सह्या करण्यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेसाठी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रेही सादर केली होती.