कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या स्थितीदर्शक अहवालामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी, या मागणीसाठी एका स्वयंसेवी संघटनेने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाच्या कोळसा खाणवाटप घोटाळ्याच्या तपासाच्या स्थिती दर्शक अहवालामध्ये केंद्रीय कायदामंत्री अश्वनीकुमार आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱयांनी हस्तक्षेप केल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले होते. य़ाच वृत्ताच्या आधारे स्वयंसेवी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये.
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या या कृतीवर तीव्र शब्दांत टीका केली होती. केंद्र सरकार सीबीआयला स्वतंत्रपणे काम करू देत नसल्याचे या घटनेतून सिद्ध होत असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी भाजपनेही केली होती.

Story img Loader