इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी भाजपचे सरचिटणीस अमित शहा आणि माजी पोलीस महासंचालक आर.आर.कौशिक यांच्याविरोधातील आरोपांची याचिका केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
शहा यांच्याविरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने शहांवर कोणतेही आरोप ठेवता येणार नसल्याचे सीबीआय न्यायालयामार्फत नमूद करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल करता येऊ शकत नसल्यामुळे पुढील कारवाईचा प्रश्नच उद्भवू शकत नाही. असे सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश गीता गोपी यांनी याचिकेवरील सुनावणी देताना म्हटले आहे. तसेच हे प्रकरणीही सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सीबीआयच्या चौकशीतील काही विधानांनाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्यामुळे या विधानांना अनुसरून शहा यांच्यावर आरोप ठेवता येणार नाहीत. असे नमूद करत शहा यांच्याविरोधात गोपीनाथ पिलई यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.
सीबीआयने कॉल रेकॉर्ड डेटा(सीडीआर) जमा केला आहे आणि प्रत्यक्षदर्शींचे विधाने शहा यांचा याप्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट करत असल्याचा आरोप गोपीनाथ पिलई यांनी केला आहे.

Story img Loader