नवी दिल्ली : १९८४च्या शीखविरोधी दंगलींमधील तीन व्यक्तींच्या हत्येचे पुल बंगश प्रकरण आणि एक गुरुद्वारा जाळणे या प्रकरणांत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. पुल बंगश गुरुद्वारा आझाद मार्केट येथे १ नोव्हेंबर १९८४ रोजी जमलेल्या जमावाला टायटलर यांनी भडकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परिणामी गुरुद्वारा पेटवण्यात आला आणि त्यात ठाकूर सिंग, बादल सिंग व गुरुचरण सिंग हे तीन शीख मारले गेले, असा आरोप सीबीआयने  विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. दंगल माजवणे, बेकायदेशीर जमाव गोळा करणे, भडकावणे, खून, खुनासाठी प्रवृत्त करणे आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणे या भादंविच्या कलमाखाली सीबीआयने आरोप ठेवले आहेत.  न्यायालय आरोपांची २ जूनला दखल घेणार आहे.