इशरत जहॉं चकमकप्रकरणी गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रामध्येही गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पुरवणी आरोपपत्रामध्ये गुप्तचर विभागाचे विशेष संचालक राजिंदर कुमार यांच्याव्यतिरिक्त तिघांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. उर्वरित तिघांमध्ये पी. मित्तल, एम. के. सिन्हा आणि राजीव वानखेडे या गुप्तचर विभागातील अधिकाऱयांचा समावेश आहे.
इशरत जहॉं चकमकप्रकरणी गुप्तचर विभागाच्या ४ अधिकाऱयांवर आरोपपत्र
इशरत जहॉं चकमकप्रकरणी गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
First published on: 06-02-2014 at 03:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi files supplementary charge sheet in encounter case of ishrat jahan