गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटचे सहकारी अमित शहा यांच्या विरोधातील प्रकरणात गुजरातमधील खोटय़ा चकमकीतील बळी पडलेल्या व्यक्तीच्या आईचे खटला कमकुवत करण्याबाबत मतपरिवर्तन करण्याच्या चर्चेसंदर्भातील कथित व्हिडिओ टेपप्रकरणी भाजपचे राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर व भूपेंद्र यादव यांचे आज सीबीआयने (गुन्हे अन्वेषण विभाग) जाबजबाब घेतले.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले, की यादव यांचे सकाळी जाबजबाब घेण्यात आले तर  जावडेकर यांचे पावणेदोनच्या सुमारास जाबजबाब झाले.
जावडेकर यांनी सांगितले, की सीबीआयने कायदेशीर आवश्यकतेनुसार आपल्याला बोलावले व आपण हजर राहिलो. सीबीआयने पक्षाचे सरचिटणीस रामलाल यांनाही बोलावले होते, तेही तुलसीराम प्रजापती खोटय़ा चकमक प्रकरणाच्या एका पत्रकाराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसत आहेत. तीनही नेत्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून आपण निरपराध आहोत असे सांगितले. स्टिंग ऑपरेशनमध्ये काही नेते प्रजापती याची आई नर्मदाबाई यांच्याशी वकालतनामा बदलण्याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. तिचा मुलगा तुलसीराम प्रजापती हा भाजपचे सरचिटणीस अमित शहा हे आरोपी असलेल्या खोटय़ा चकमकीत मारला गेला आहे. भाजपने असा दावा केला आहे, की या स्टिंग ऑपरेशनमध्ये तीनही भाजप नेत्यांबाबत काही आक्षेपार्ह सापडलेले नाही. प्रजापती याने सोहराबुद्दीन शेख याला डिसेंबर २००६ मध्ये चकमकीत ठार केल्याची घटना पाहिली होती व तो गुजरातमधील या खोटय़ा चकमकीच्या प्रकरणातील साक्षीदार होता.
स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या पत्रकाराने असा आरोप केला आहे, की,वरिष्ठ भाजप नेत्यांनी तारीख नसलेला वकालतनामा नर्मदाबाईकडून तयार करून घेऊन यातील न्यायालयीन खटला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता.

Story img Loader