दुय्यम दर्जाची लष्करी वाहने खरेदी करण्यासाठी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने आपल्याला लाच दिली असल्याची तक्रार भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी केली होती, मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सिंग देऊ न शकल्याने या प्रकरणाचा तपास थांबविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
जनरल सिंग यांच्या तक्रारीनुसार आम्ही प्राथमिक चौकशी केली. मात्र सुमारे वर्षभर तपास करूनही म्हणावे असे काहीही हाती लागले नाही, असे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader