बोकारो नोकरभरती प्रक्रियेतील घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय पोलादमंत्री रामविलास पासवान यांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी युती करण्यासंदर्भात रामविलास पासवान यांच्या पक्षाची सध्या भाजपबरोबर चर्चा सुरू आहे. यापूर्वी रामविलास पासवान यांचा पक्ष सत्ताधारी युपीए सरकारचा भाग होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागवाटपासंदर्भात काँग्रेसकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे पासवान यांनी भाजपशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याच पार्श्वभूमीवर युपीए सरकारमध्ये पासवान केंद्रीय मंत्री असताना झालेल्या बोकारो स्टील प्लांटमधील नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशीला पुन्हा एकदा सुरूवात झाल्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. यासंदर्भात पासवान यांच्याकडील काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून सीबीआयमार्फत त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सीबीआयच्या एका ज्येष्ठ अधिका-याकडून देण्यात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi may question ram vilas paswan in bokaro recruitment case