Kolkata Rape and Murder : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर ९ ऑगस्टला बलात्कार झाला. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. कोलकाता पोलिसांकडे असलेल्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.

९ ऑगस्टला नेमकी काय घटना घडली?

९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा ( Kolkata Rape and Murder ) होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातो आहे. आता सीबीआयने डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Rape and Murder : “९ ऑगस्ट पूर्वी आम्ही १६० जणी होतो, आता..”; आर.जी. कर महाविद्यालयातील महिला डॉक्टरांना भीतीने ग्रासलं
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
R G Kar Hospital News
R.G. Kar Hospital Black History : ‘पोर्नोग्राफी, गूढ मृत्यू आणि…’, कोलकाता डॉक्टरच्या हत्येने उलगडला आर. जी. कर रुग्णालयाचा काळा इतिहास
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Kolkata Rape and Murder Case
Kolkata Doctor Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण : माजी प्राचार्यासह चार डॉक्टरांची होणार पॉलिग्राफ चाचणी
Kolkata Doctor Rape Case fact check
video : कोलकाता बलात्कार-हत्येची घटना डॉक्टरांमुळे झाली उघड? पीडितेचा मृतदेह नेणारी गाडी रोखली? वाचा सत्य
RJ Kar Hospital
Kolkata Rape Case : “मी त्याला भेटले तर विचारेन की…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
Kolkata Rape and Murder Accused Sujoy Roy
Sanjoy Roy : “संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर
Kolkata Doctor Rape-Murder Case
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. देशाच्या विविध भागात डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. (फोटो: पीटीआय)

संजय रॉयला पोलिसांनी केली अटक

कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णलयात काम करणाऱ्या संजय रॉयने डॉक्टर महिलेवर बलात्कार ( Kolkata Rape and Murder ) केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या केली. या प्रकरणात डॉक्टरांचं आंदोलनही झालं. संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. संजय रॉय हा त्या दिवशी नशेत होता. तसंच त्याने पहाटे ३ च्या दरम्यान रुग्णालयात येऊन या डॉक्टर महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. संजय रॉयने गुन्हा कबूल केला आहे. दरम्यान सीबीआयने एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- R.G. Kar Hospital Black History : ‘पोर्नोग्राफी, गूढ मृत्यू आणि…’, कोलकाता डॉक्टरच्या हत्येने उलगडला आर. जी. कर रुग्णालयाचा काळा इतिहास

पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला होता का?

या प्रकरणात सीबीआयचा तपास सुरु आहे. सीबीआयने म्हटलं आहे की ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला नाही. संजय रॉय ज्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्यानेच तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. सीबीआयच्या सूत्रांनी इंडिया टुडेला ही माहिती दिली आहे. संजय रॉय पहाटेच्या सुमारास रुग्णालयात आला त्यानंतर त्याने सेमिनार हॉलमध्ये झोपलेल्या डॉक्टर महिलेवर बलात्कार केला. या डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाला का? हा प्रश्न आंदोलनाच्या दरम्यान विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर आता सीबीआयच्या सूत्रांनी दिलं आहे.