राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांची गुरुवारी सीबीआयकडून तीन तास चौकशी करण्यात आली. २०१० मध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये मॉरिशसमधील कंपनीबरोबर केलेल्या करारांमध्ये अनियमितता आढळल्याने कलमाडी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. कलमाडी हे राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख होते.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी या कंपनीबरोबर करण्यात आलेल्या कराराबद्दल आणि त्यावरील आरोपांबद्दल कलमाडी यांच्याकडे विचारणा करण्यात आली. संबंधित कंपन्यांबरोबरच हे करार का करण्यात आले, याचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नेमलेल्या व्ही. के. शुंग्लू समितीने दिलेल्या अहवालात संबंधित कंपन्यांबरोबर करार करताना नियमांचा भंग करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यावरही कलमाडी यांच्याकडे चौकशी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा