सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी तब्बल ४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुणाल घोष हेही एक आरोपी आहेत.
एकाच दिवशी विक्रमी गुन्हे दाखल करताना विभागाने ओडिशा पोलिसांकडून ४२ गुन्हे आपल्याकडे हस्तांतरित केले असून पश्चिम बंगालमधील नव्या तीन गुन्’ाांचा समावेश करण्यात आला आहे. शारदा समुहाचे अध्यक्ष सुदिप्ता सेन, शारदा रिएल्टीचे तत्कालिन संचालक देबजानी मुखर्जी व शारदा मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल घोष यांचीही या प्रकरणात आरोपी म्हणून नावे घेण्यात आली आहेत. समुहातील चार कंपन्यांची नावे यात आली आहेत. ओडिशातील ४३ गुन्’ाांमध्ये तेथील ४३ कंपन्यांसह त्यांच्या संचालकाची नावे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तपासा दरम्यान भांडवली बाजार नियामक सेबी, रिझव्‍‌र्ह बँक तसेच कंपनी व्यवहार खाते यांची या घोटाळ्यात काही भूमिका आहे का, हेही तपासले जाईल, असेही तपास विभागाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा