कोळसा खाणींच्या वाटपात अनियमितता झाल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आह़े त्यानंतर सोमवारी पाच शहरांमध्ये सीबीआयकडून शोधमोहीम राबविण्यात आली़
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ही कंपनी आरसी रुंग्टा समूहाची आह़े या कंपनीला जानेवारी २००६ मध्ये उत्तर ढाडू कोळसा खंडाचे वाटप करण्यात आले होत़े या वाटपामध्ये अनेक अनियमितता असल्याचे सीबीआयच्या लक्षात आल़े त्यानंतरच या कंपनी आणि अज्ञात शासकीय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आह़े
याप्रकरणी अजूनही वाराणसी, हझारीबाग, कोलकाता, रांची आणि दिल्ली येथे शोधकार्य सुरू असल्याने सीबीआयने दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालातील सर्व तपशील जाहीर करण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितल़े याबाबत कंपनीला पाठविण्यात आलेल्या विद्युत टपालावर (ई-मेल) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही़
कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेला हा दहावा प्रथम माहिती अहवाल आह़े याप्रकरणी आधीही सीबीआयने फसवणूक, अर्जात खरी माहिती लपविणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत़
सीबीआयकडून कोळसा घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल
कोळसा खाणींच्या वाटपात अनियमितता झाल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आह़े त्यानंतर सोमवारी पाच शहरांमध्ये सीबीआयकडून शोधमोहीम राबविण्यात आली़.

First published on: 11-03-2013 at 05:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi registers fresh case in coal scam