अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी घेण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टर व्यवहारात ३६०० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी माजी हवाईदलप्रमुख एस पी त्यागी यांच्या चुलत भावांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे नव्याने चौकशी सुरू केली आहे. ऑगस्टा वेस्टलॅंडकडून घेण्यात येणाऱ्या या व्यवहारप्रकरणी मध्यस्थी करणाऱ्या गुईडो हॅश्चेक याने त्यागी बंधूंना पैसे दिल्याचा आरोप आहे.
हॅश्चेक याने केलेल्या दाव्यानुसार सीबीआयने नुकतीच संजीव ऊर्फ ज्युली, राजीव ऊर्फ डोक्सा आणि संदीय यांची हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेलिकॉप्टर व्यवहारप्रकरणी आपला काहीही हात नाही. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द केल्याचे संजीव त्यागी यांनी याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीबाबत सांगितले. तसेच सीबीआयला चौकशीत पूर्णपणे सहकार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीबीआयने आमच्याविरोधात लावलेल्या आरोपांबाबत कॅग अहवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात आम्हाला सूट मिळाली असल्याचे ते म्हणाले.
संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि सीबीआय चौकशीदरम्यान हॅश्चेक याने तांत्रिक कामासाठी तसेच भारतातील विविध परवानग्यांबाबत त्यागी बंधूंना पैसे दिल्याचे कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा