दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना समन्स बजावला आहे. उद्या ( सोमवारी ) ११ सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.

हेही वाचा – VIDEO: इराणच्या जेलमध्ये मोठी आग, गोळीबाराच्या आवाजानं परिसर दणाणला, हिजाबविरोधी आंदोलनाशी संबंध?

उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने समन्स बजावल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. “माझ्या घरी सीबीआयने छापा टाकला होता. त्यावेळी १४ तास त्यांनी चौकशी केली. मात्र, त्यांना काहीच मिळाले नाही. माझ्या बॅंक लॉकरचीही त्यांनी तपासणी केली, तिथेही त्यांना काहीच मिळाले नाही. आता त्यांनी मला सोमवारी ११ वाजता पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. मी चौकशीसाठी जाणार असून त्यांना पूर्ण सहयोग करेन”, असे ट्वीट सिसोदिया यांनी केले आहे.

दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या ट्वीटवर अरविंद केजरीवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे आजचे भगत सिंह आहेत. आज ७५ वर्षांनंतर देशात असा शिक्षणमंत्री आहे, ज्याने गरीबांच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या गरीब मुलांच्या प्रार्थना तुमच्याबरोबर आहेत”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “रुपया घसरत नाहीये, तर डॉलर मजूबत होतोय,” निर्मला सीतारामन यांचे विधान

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली होती. दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अखेर केजरीवाल सरकारला हे नवे उत्पादन शुल्क धोरण रद्द करावे लागले होते.

Story img Loader