केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डच्या (CBSC) दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. या परीक्षेत बिहारमधील श्रीजा नावाची मुलगी राज्यात प्रथम आली आहे. तिला ९९.४० टक्के गुण मिळाले आहेत. श्रीजाचा दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. ती चार वर्षांची असताना तिच्या आईचं निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी तिला वाऱ्यावर सोडून देत दुसऱ्या महिलेशी संसार थाटला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडिलांनी सांभाळ करण्यास नकार दिल्यानंतर, अनाथ झालेली श्रीजा आपल्या आजी-आजोबांकडे राहायला गेली. तिने कठोर परिश्रम घेत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. सीबीएससी १०वीच्या परीक्षेत तिनं ९९.४ टक्के मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. नातीला मिळालेल्या यशामुळे आजी-आजोबांसह संपूर्ण कुटुंब आनंदी झालं आहे.

हेही वाचा- Success Story : सफाई कर्मचारीचा मुलगा झाला तहसीलदार

श्रीजाच्या यशाबाबत बोलताना आजी म्हणाल्या,”मी आज खूप खूश आहे, माझ्या नातीनं माझं नाव उज्ज्वल केलं. माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर जावयानं नातीला वाऱ्यावर सोडलं होतं. आम्ही तिचा सांभाळ केला, आज तिने बिहार राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने जावयाला पश्चाताप होत असेल. मुलीच्या मृत्यूनंतर जावई कधीही नातीला भेटायला आले नाहीत” अशा भावना श्रीजाच्या आजीनं व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbsc 10th result bihar topper sreeja viral video rmm