केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर बारावीच्या गणित या विषयाची परीक्षा घेतली. एकूण ४० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० निवडीच्या आधारावर प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. परीक्षेची तीन विभागात विभागणी करण्यात आली होती. मात्र परीक्षा दिल्यानंतर केंद्राबाहेर आलेल्या विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला. कारण पेपर खूप लांब असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षेत विचारलेले प्रश्न सोडवण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आता यावर आपली मतं मांडली आहेत. गणित परीक्षेची प्रश्नपत्रिका लांब आणि कठीण होती, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
परीक्षेसाठी दीड तासांऐवजी अडीच तास द्यायला हवे होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार प्रश्नपत्रिका थोडी अवघड होती. ज्याने रोज गणिताच्या प्रश्नांचा सराव केला असेल तो पेपर सोडवत होता. “सुमारे ५० टक्के प्रश्न खूप सोपे होते पण बाकीचे कठीण होते. निवडींचाही फारसा उपयोग झाला नाही,” असं १२ वीची विद्यार्थिंनी सिया हीने सांगितलं. “पेपर माझ्यासाठी कठीणापेक्षा जास्त लांब होता. मॅट्रिक्सचे प्रश्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागला आणि नंतर त्यात बरेच होते. जर तुम्ही सोपे प्रश्न निवडले, तर त्याला खूप वेळ लागला, कठीण प्रश्न अधिक अवघड होते.” असं अनिर्ध या बारावीच्या विद्यार्थ्याने सांगितलं.
RRB NTPC 2021 परीक्षा निकालाची तारीख जाहीर; असा पाहाल आपला रिझल्ट
दुसरीकडे शिक्षक मात्र पेपरवर खूश होते. “हा एक संतुलित पेपर होता आणि विद्यार्थ्यांमध्ये पेपर सोडवण्याची अडचण अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे पुरेसे सोपे आहे, पण पूर्ण गुण मिळवणे कठीण आहे. सरासरी विद्यार्थी २५ ते ३२ दरम्यान कुठेही सहज गुण मिळवू शकतो. ३२ पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी चांगली बुद्धिमत्ता असणे आवश्यक आहे,” श्री ओ.पी. गुप्ता, या गणिताच्या शिक्षकांनी टाईम्स नाऊशी बोलताना सांगितलं.,