झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मॉर्निंग वॉकला गेलेले जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद यांचा एका दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. मात्र या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा अपघात होता कि घातपात असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ज्या गाडीच्या धडकेमध्ये आनंद यांचा मृत्यू झाला त्या गाडीने मुद्दाम त्यांना धडक दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. माजी आमदाराच्या मर्जीतील व्यक्ती असणाऱ्या रंजय हत्याकांडसारख्या प्रकरणाबरोबरच अनेक महत्वाच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या आनंद यांची हत्या करण्यात आलीय का असा प्रश्न उपस्थित होत असतानचा पोलिसांनीही ही शक्यता पडताळून पाहण्याच्या दृष्टीने तपास सुरु केलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्ल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांसंदर्भातील माहिती लवकरच दिली जाईल आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्व ते सगळे प्रयत्न करतील. मात्र या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करावी अशी मागणी माजी आमदाराने केलीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा