‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. तेजपाल पीडित महिलेसोबत गोव्यातील हॉटेलच्या लिफ्टमध्ये प्रवेश करीत असल्याचे तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणावरून आढळले आहे. हे चित्रीकरण पोलीसांना मिळाले आहे. पीडित महिलेने पोलीसांपुढे दिलेला जबाब आणि सीसीटीव्हीतील घटनाक्रम तंतोतंत जुळत असल्यामुळे तेजपाल यांच्यापुढील अडचणीत वाढ झालीये.
‘तहलका’तील महिला पत्रकाराने तेजपाल यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. गोव्यामध्ये ‘थिंक फेस्ट’ कार्यक्रमात एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने केली होती. यानंतर तेजपाल यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली गोव्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा पोलीसांनी तेजपाल यांना गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने तेजपाल यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे. विनयभंगाच्या घटनेनंतर संबंधित महिलेने आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनीही गुरुवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
पीडित महिलेसोबत तेजपाल लिफ्टमध्ये जातानाचे चित्रीकरण पोलीसांच्या हाती
'तहलका'चे संपादक तरुण तेजपाल यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
First published on: 28-11-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv grab shows tejpal entering lift with woman journo police