सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून मंगळवारी पहाटे पाकने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात आतापर्यंत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले असून पाच जण जखमी झाले आहेत. रामगढ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात राजिंदर कौर या महिलेचा मृत्यू झाला, तर जेर्दा गावात दोन मुलांचा मृत्यू झाला. आजवर अनेकदा पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून यात अनेक भारतीय जवान आणि नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दहशतवादी सीमारेषेवर घुसखोरी करून आपल्या घातपात घडवतात. सीमारेषेवर दहशतवादी नेमके भारतीय हद्दीत घुसखोरी करतात तरी कशी? याचा विचार जर तुम्ही करत असाल तर नुकतेच पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात भारत-पाक सीमारेषेवर पाक दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करताना या व्हिडिओमध्ये दिसून येतात. जमिनीवर रांगत हे दहशतवादी पुढे सरकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. दोनवेळा एकाच जागी घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते.
#WATCH: CCTV visuals of Pakistani terrorists infiltrating across the International border in J&K's Kathua district (Thermal imagery) pic.twitter.com/3XNRTzNdTS
— ANI (@ANI) November 1, 2016