पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन ही गंभीर बाब असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे.
एक वर्षात ९६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
सलमान खुर्शिद म्हणाले, “शस्त्रसंधीचे उल्लंघन हा फक्त दोन्ही देशांच्या दुतावासातील विषय नाही. लष्कराशी याचा संबंध आहे. सरकारचेही या विषयाला प्राधान्य आहे. सीमारेषेवरील सद्यस्थिती दोन्ही देशांच्या लष्कराला माहिती आहे. तसेच आमचा भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास असून कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन हा भारतासाठी गंभीरतेचा विषय आहे.”
पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक, सात भारतीय ठाण्यांवर हल्ला
त्याचबरोबर, काश्मीर खोऱयातील नागरिकांची सुरक्षा करण्याची जबाबदारी आमची असून, आम्ही ती पूर्ण करू. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविला जाईल असेही खुर्शिद म्हणाले.

Story img Loader