पाकिस्तानी सैन्याने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. गेल्या पंधरा दिवसातील ही पाचवी घटना आहे.
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील नंगी तेकरी भागातील भारतीय चौक्यांवर शनिवारी रात्री पाक सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे पंधरा मिनिटे हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात कोणीही जवान जखमी झालेला नाही.
याआधी पाच मे ला राजौरी जिल्ह्यातील भिंबेर गली, तीन मे ला पूंछ जिल्ह्यातील मेंढर तर २८ एप्रिलला राजौरीमधील भिंबेर गली भागात पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला होता. २५ एप्रिललाही पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता.

Story img Loader