Census in India : देशातील जनगणनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार २०२५ मध्ये भारताच्या जनगणनेला सुरुवात करण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये जनगणनेला सुरुवात केल्यानंतर २०२६ पर्यंत ही जनगणना पूर्ण होण्याचा अंदाज आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नियोजन सुरू केलं असल्याची माहिती सांगितली जात आहे. दर दहा वर्षांनी देशातील जनगणना केली जात असते. मात्र. कोरोनाच्या काळात २०२१ ची जनगणना लांबणीवर पडली होती. त्यानंतर आता केंद्र सरकार २०२५ मध्ये जनगणना करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने या संदर्भात अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पुढील २०२५ या वर्षापासून केंद्र सरकार जनगणनेला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जात आहे. जर केंद्र सरकारने २०२५ मध्ये जनगणना करण्यास सुरुवात केली तर २०२६ पर्यंत पूर्ण होऊन त्या जनगणनेचा अंतिम अहवाल २०२६ मध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्या आकडा या माध्यमातून समोर येणार आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

Raj Thacekray List
Maharashtra MNS Candidate List 2024 : मनसेच्या पाचव्या यादीत १५ जणांना संधी, आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांची नावे एका क्लिकवर!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
bjp releases first list of 99 candidates for maharashtra polls
maharashtra polls 2024 : भाजपच्या यादीनंतर बंडाचे वारे, महायुतीचा तिढा कायम असताना ९९ नावांची घोषणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date| Maharashtra Assembly Election 2024 Date
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ९ कोटी मतदार ठरवणार महाराष्ट्राचं भवितव्य!
Maharashtra Assemblly Election 2024, 288 MLA's List
महाराष्ट्र विधानसभेत २०१९ ला कोणाचे किती आमदार होते? पक्षफुटीनंतरची स्थिती काय? वाचा २८८ आमदारांची यादी
aspirants in congress increased in nandurbar district to contest assembly elections
Maharashtra Elections 2024 : नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली
Haryana and jammu Kashmir assembly election
अग्रलेख: अ-पक्षांचा जयो झाला…
CM Eknath Shinde
Haryana Assembly Election Result 2024 Live : “किसान, जवान, पैलवान”, यांनी आणलं भाजपाचं सरकार – मुख्यमंत्री शिंदे

हेही वाचा : Yogi Adityanath : Video : ‘३०० रुपयांचा चेक, हे फक्त भाजपाच करू शकतं’, योगी सरकार संस्कृत शिष्यवृत्ती योजनेवरून ट्रोल; नेमकं काय घडलं?

याबरोबरच देशातील जनगणना पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार लोकसभा जागांच्या सीमांकनाचा अभ्यासही सुरु करणार असल्याची माहिती काही वृत्तानुसार समोर आली आहे. मात्र, याबाबतही अद्याप अधिकृत कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, २०२१ मध्ये देशाची जनगणना झाली नव्हती, त्यामुळे आता २०२५ मध्ये जर जनगणना झाली तर चार वर्षांच्या लांबणीवर होणार आहे. त्यामुळे देशाची लोकसंध्या किती टक्यांनी वाढली हे जनगणनेचा अहवाल समोर आल्यानंतर स्पष्ट होईल.

दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते केंद्र सरकारकडे जातीवर आधारित जनगणनेची मागणी करत आहेत. विरोधकांच्या मते जातीवर आधारित जनगणना केल्यास सर्व जातीजमातींच्या लोकांची संख्या समोर येईल. मात्र, भारतीय जनता पक्षाचा विरोधकांच्या या मागीला विरोध दर्शविलेला आहे.