गेल्या काही दिवसांपासून रुपयाचं मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाल्याचं बाजारातील आकडेवारीवरून दिसून आलं आहे. या आठवड्यात गुरुवारी रुपयानं तब्बल ८३ पैशांचं अवमूल्यन नोंदवलं. गेल्या सात महिन्यांतली ही सर्वात मोठी पडझड होती. शुक्रवारीही रुपयानं आपला उलटा प्रवास कायम ठेवला असून तब्बल ३० पैशांनी रुपया पडला. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आता रुपयाचं मूल्य थेट ८१.०९ इतकं झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात वेगळी भूमिका मांडत गुंतवणूकदारांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

देशातली शिखर बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि रुपयाच्या घटत्या दरावर लक्ष ठेवून असल्याचं निर्मला सीतारमण यांनी शनिवारी माध्यमांना सांगितलं. मात्र, इतर देशांच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन कमी असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

lokmanas
लोकमानस: सर्वसमावेशक अर्थसंकल्पाची अपेक्षा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Rupee biggest fall in two weeks print eco news
रुपयाची दोन आठवड्यांतील सर्वात मोठी आपटी
vicharmanch article on gst and financial decline
आपली आर्थिक घसरण राेखण्यासाठी…
Loksatta editorial challenges before fm nirmala sitharaman in union budget 2025
अग्रलेख: सीतारामन ‘सिंग’ होतील?
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Mallikarjun Kharge Dubki Remark
Mallikarjun Kharge : “गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी…”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून नवा वाद; भाजपाने दिलं प्रत्युत्तर
raghuram rajan rbi loksatta news
Raghuram Rajan : डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाबाबत रघुराम राजन यांनी दिला महत्त्वाचा इशारा

“इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे कुठलं चलन जर कमीत कमी प्रभावित झालं असेल, तर तो रुपया आहे. या बाबतीत आपण चांगली कामगिरी केली आहे”, असं सीतारमण यांनी नमूद केलं.

रुपयाचं आत्तापर्यंतच सर्वाधिक अवमूल्यन झालेलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक बाजूवर लक्ष असून रुपयाच्या बाबतीत आपण चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. रशिया-युक्रेन युद्धासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या घडामोडींचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर चलनांचं अवमूल्यन होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Story img Loader