तब्बल तीन वर्षे काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्याविष़ी टाळाटाळ केल्यानंतर अखेर निवडणुकांच्या रणधुमाळीतच केंद्र शासनाने ती जाहीर केली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘लाएकटेंस्टिंग’ बँकेतील २६ भारतीय खातेधारकांची नावे सादर केली आहेत़  यांपैकी १८ काळा पैसाधारकांविरोधात आय कर विभागातर्फे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या १८ जणांची नावे उघड करण्यात आली असून उर्वरित आठ जणांची नावे पाकीटबंद आहेत़
राम जेठमलानी यांनी ‘काळा पैसाधारकांची नावे उघड करण्याविषयी आदेश देण्याची विनंती करणारी’ जनहित याचिका दाखल केली होती. त्यास अनुसरून २०११ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने सदर नावे जारी करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र त्या आदेशांचे पालन न झाल्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘काळे’ धनदांडगे
मोहन मनोज धुपेलिया, अंबरीश मनोज धुपेलिया, भव्य मनोज धुपेलिया, मनोज धुपेलिया आणि रुपल धुपेलिया (अंबुनोव्हा न्यास आणि मारर्लिन मॅनेजमेंट), अरुणकुमार रमणिकलाल मेहता आणि हर्षद रमणिकलाल मेहता (दैनिज स्टीफटंग आणि द्रायेड स्टीफटंग न्यास), के. एम. मॅमन (वेबस्टर फाऊंडेशन), अरुण कोच्चर (उर्वशी फाऊंडेशन), अशोक जयपुरिया (राज फाऊंडेशन), हसमुख ईश्वरलाल गांधी, चिंतन हसमुख गांधी, मधू हसमुख गांधी, दिवंगत मिरव हसमुख गांधी (मिनाची न्यास), चंद्रकांत ईश्वरलाल गांधी, राजेश चंद्रकांत गांधी, विराज चंद्रकांत गांधी आणि धनलक्ष्मी चंद्रकांत गांधी (रुविशा न्यास)