देशातील सुमारे ३१ हजार स्वयंसेवी संस्थांना सरकारने परदेशी देणग्यांबाबत वार्षिक विवरणपत्रे भरली नसल्याबद्दल नोटिसा दिल्या आहेत, असे राज्यसभेत सांगण्यात आले.
गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले, की २०११-१२ मध्ये २१,४९३ संस्थांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्यांनी परदेशी देणग्या नियंत्रण कायदा २०१० अन्वये २००६-०७ व २००७-०८ व २००८-०९ या वर्षांत विवरण पत्रे भरली नाहीत. २०१४ मध्ये १०,३४३ स्वयंसेवी संस्थांना नोटिसा पाठवल्या आहेत, त्यांनी २००९-१० व २०११-१२ या वर्षांमध्ये विवरण पत्रे भरली नव्हती.
रिजिजू यांनी सांगितले, की काही स्वयंसेवी संस्थांबाबत गुप्तचरांचे प्रतिकूल अहवाल असून त्यात तुतीकोरिन डायोसेसान, इस्ट कोस्ट रीसर्च अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट टूथूकुडी, सेंटर फॉर प्रमोशन अँड सोशल कन्सर्न्‍स, मदुराई, ग्रीनपीस इंडिया सोसायटी, चेन्नई यांचा समावेश आहे. एफसीआरए कायद्यानुसार चौकशी केली असता तुतीकोरिन डायोसेसान, सेंटर फॉर प्रमोशन अँड सोशल कन्सर्न  संस्थांचा परवाना रद्द करण्यात आला असून त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. एकूण ३१ हजार स्वयंसेवी संस्थांना सरकारने नोटिसा पाठवल्या असून त्या परदेशी देणग्यांची विवरण पत्रे न भरल्याबाबत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader