एक्स्प्रेस, नवी दिल्ली
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी येथील एकता स्थळ आणि विजय घाट येथील जागा सरकारने सूचविल्या आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय आणि गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकता स्थळ येथे माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांची समाधी आहे. तर विजय घाट येथे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे स्मारक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरविकास सचिव के. श्रीनिवास हे प्रस्तावित जागांबाबत मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना माहिती देतील. ट्रस्टची स्थापना झाल्यावर जागा देण्यात येईल. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांना नावे देण्यास सांगितले जाईल.

हेही वाचा : इस्रायलच्या गाझापट्टीतील हवाई हल्ल्यात १० ठार, मृतांमध्ये ३ बालकांचा समावेश

मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी निधन झाले. केंद्र सरकारने सिंग यांच्या स्मारकाबाबत काँग्रेसची मागणी मान्य केली होती. सिंग यांच्यावर निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांनी सरकारवर टीका केली होती.

त्याला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर देत, सरकारने स्मारकासाठी जागांचा शोध सुरू केल्याचे नमूद केले होते. याबाबत काँग्रेस अपप्रचार करत असल्याची टीकाही नड्डा यांनी केली होती.