देशभरात वेगाने लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असताना रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आलेले असताना तिसऱ्या लाटेची संभाव्य भिती देखील तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग जरी वाढला असला, तरी तिसऱ्या लाटेला टाळायचं असेल, तर पुढील तीन महिने नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेणं आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आज दुपारी दिल्लीत झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा देण्यात आला आहे.

करोनाचं संकट संपलेलं नाही!

निर्बंध शिथिल करण्यात आले असले आणि लसीकरणाचा वेग देखील वाढलेला असला, तरी करोनाचं संकट आणि त्याने उभी केलेलं आव्हानं अजून देखील संपलेली नाहीत, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या संकटाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणं आवश्यक असल्याची गरज देखील व्यक्त करण्यात आली आहे. “दिवसाला करोनाचे सरासरी २० हजार नवे बाधित आढळत आहेत. गेल्या आठवड्यात यापैकी ५६ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये सापडले आहेत”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

अधिक सतर्क राहणं गरजेचं

दरम्यान, पुढील तीन महिन्यात विविध प्रकारचे सण असून या काळामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचं आवाहन केंद्राकडून करण्यात आलं आहे. “ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात आपण अधिक सतर्क राहायला हवं. गर्दीची ठिकाणं किंवा विनाकारण प्रवास करणं आपण टाळायला हवं. घरी राहून व्हर्च्युअल पद्धतीने सण-उत्सव साजरे करावेत, ऑनलाईन शॉपिंग करावी”, असं आवाहन लव अग्रवाल यांनी केलं आहे.

सण-उत्सवांचा काळ जवळ येत असताना करोना रुग्णवाढीचे स्पाईक्स येण्याची भिती केंद्र सरकारने याआधीच व्यक्त केली आहे. तसेच, तिसऱ्या लाटेची शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेणं गरजेचं असून कोविड-१९ दूर ठेवण्यासाठी आवश्यक नियम पाळणं आवश्यक असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. देशात आत्तापर्यंत ७१ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला असून २७ टक्के नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे.

आकडेवारी काय सांगते…

देशातील करोनाच्या आजच्या आकडेवारीनुसार २४ तासांत २२ हजार ४३१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तींचा आखडा ३ कोटी ३८ लाख ९४ हजार ३१२ इतका झाला आहे. यापैकी आजघडीला २ लाख ४४ हजार १९८ अॅक्टिव रुग्ण आहेत. हे प्रमाण गेल्या ७ महिन्यांत सर्वात कमी आहे. याशिवाय आज सलग १३व्या दिवशी दिवसभरात आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा ३० हजारांच्या खाली राहिला आहे.