Ladakh New Districts : केंद्र सरकारने लडाखबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील माहिती अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून दिली आहे. तसेच लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याचा निर्णय हा विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी घेतल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, लडाखमध्ये आता ज़ंस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग असे पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर पोस्ट करत लडाखच्या लोकांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi : “…अन्यथा पुढचे पंतप्रधान जातीजनगणना करताना दिसतील”; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका!

अमित शाह यांनी काय म्हटलं?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज़ंस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे आता प्रशासनाला बळ देतील आणि लोकांसाठी फायद्याचे ठरतील. मोदी सरकार लडाखमधील लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे”, असं अमित शाह यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लडाखमधील नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, “लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती हे उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या दिशेने एक पाऊल आहे. झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग आता अधिक लक्ष केंद्रित करतील, सेवा आणि संधी लोकांच्या आणखी जवळ आणतील. लडाखमधील लोकांचे अभिनंदन.”

लडाखमध्ये आधी होते दोन जिल्हे

जम्मू-काश्मीरपासून लडाख २०१९ मध्ये वेगळे करण्यात आले. त्यामुळे लडाख एक नवीन केंद्रशासित प्रदेश बनले. त्यावेळी केंद्रशासित प्रदेशामध्ये लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते. मात्र, आता लडाखमध्ये आणखी पाच नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. आता लडाखमध्ये ज़ंस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग ही नवीन जिल्हे असणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central govt big decision of ladakh new districts home minister amit shah announcement to establish five new districts in ladakh gkt