Good Governance Index 2023 : केंद्र सरकारने सुशासन निर्देशांक २०२३ (Good Governance Index 2023) जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्देशांकामध्ये राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांची द्विवार्षिक रँकिंग असते जी ‘गुड गव्हर्नन्स वीक’ (१९ डिसेंबर ते २५ डिसेंबर) दरम्यान जाहीर करण्यात येणार होती. मात्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आता याची पुढील आवृत्ती ही २०२५ मध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.

२५ डिसेंबर २०१९, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी हा निर्देशांक सुरू करण्यात आला होता. २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिवस (गुड गव्हर्नन्स डे) म्हणून साजरा केला जातो. तसेच या सुशासन निर्देशकांमध्ये कृषी, आर्थिक प्रशासन, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिक केंद्रित प्रशासन यासह ५० हून अधिक इंडिकेटर्सचा समावेश आहे. तामिळनाडू आणि गुजरात यांनी अनुक्रमे २०१९ आणि २०२१ च्या रँकिंगमध्ये मोठ्या राज्यांमध्ये पहिले स्थान मिळवले होते.

Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
Moody Analytics made a statement on fiscal and monetary policy print eco news
वित्तीय, पतधोरणात मोठ्या सुधारणेनंतरच ६.४ टक्के विकासवेग शक्य- मूडीज
financial news loksatta
राज्य उत्पन्नाच्या प्रभावी अंदाजासाठी माहितीची गतीमान देवाणघेवाण आवश्यक, राज्य उत्पन्न सल्लागार समितीच्या बैठकीचा सूर
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाकडून (Department of Administrative Reforms and Public Grievances) २०२३ निर्देशांक ७ डिसेंबर पर्यंत जारी करण्याचे नियोजन केले जात होते.

डीएआरपीजी (DARPG) ने १९ ते २४ डिसेंबरपर्यंत लोकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय मोहीम ‘प्रशासन गाव की ओर’ जाहीर करतेवेळी एक प्रसिद्धिपत्र जारी केले होते. ज्यामध्ये विशेष अभियान ४.० चा मुल्यांकन अहवाल, सुशासन निर्देशांक २०२३ आणि CPGRAMS चा वार्षिक अहवाल जारी केला जाईल असे सांगण्यात आले होते.

तसेच नोव्हेंबर महिन्यात जारी केलेल्या मंत्रालयाच्या २०२३-२०२४च्या वार्षिक अहवालात विभागाने माहिती दिली होती की, ‘पहिला सुशासन निर्देशांक २०१९ मध्ये, दुसरा सुशासन निर्देशांक २०२१ मध्ये जारी करण्यात आला होता. तर तिसरा सुशासन निर्देशांक २०२३ तयार करण्यात आला असून तो लवकरच प्रसिद्ध केला जाईल’.

हेही वाचा>> “…तर बायको पळून जाईल”, वर्क-लाइफ बॅलन्सच्या मुद्द्यावर गौतम अदाणी स्पष्टच बोलले; पाहा…

नेमकं कारण काय?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशासन निर्देशांक २०२३ हा २३ डिसेंबर रोजीच जाहीर केला जाणार होता, पण सरकारने पुढे तो जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यांकडून गोळा केलेला डेटा हा २०२३ शी संबंधीत होता आणि २०२४ च्या शेवटी तो जारी केला तर डेटा कालबाह्य किंवा जुना ठरेल. त्यामुळे सुशासन निर्देशांकाची प्रक्रिया पुन्हा राबवली जाईल आणि नवीन डेटा गोळा केला जाईल.

DARPG चे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की ‘सुशासन निर्देशांक हे राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या मूल्यांकनाची द्विवार्षिक आवृत्ती आहे. पुढील आवृत्ती डिसेंबर २०२५ मध्ये प्रकाशित केली जाईल. DARPG कडून २०२१ आणि २०१९ चे सुशासन निर्देशांक जारी करण्यात आले आहेत. DARPG ने २०२१-२०२४ या कालावधीसाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि अरूणाचल प्रदेशसाठी जिल्हा सुशासन निर्देशांक प्रकाशित केला आहे.

२५ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलेल्या २०२१च्या निर्देशांकात १० क्षेत्रातील ५८ इंडिकेटर्सचा समावेश करण्यात आला होता.या रँकिंगमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर राहिले, तर २० राज्यांच्या २०१९ पासूनच्या आकडेवारीतसुधारणा दिसून आली आहे.

Story img Loader