केंद्र सरकारने करोना लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार १५ जुलैपासून १८ वर्षावरील सर्वांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत करोना लसीचा बूस्टर डोस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या देशभरात करोना लसीकरणाच्या मोहिमेत केवळ पहिला आणि दुसरा डोसच सर्वांना मोफत देण्यात येतोय. बुस्टर डोस केवळ ६० वर्षांवरील वयोवृद्ध व आरोग्य कर्मचाऱ्यांनाच मोफत आहे. इतर नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर शुल्क भरून बुस्टर डोस घ्यावा लागत आहे.

करोना विषाणूंच्या नवनव्या व्हेरिएंटचा धोका पाहता वैद्यकीय तज्ज्ञ बुस्टर डोसचा सल्ला देत आहेत. मात्र, बुस्टर डोस घेण्याचं प्रमाण कमी आहे. अशास्थितीत केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने देशातील बुस्टर डोस मोहिमेला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे १८-५९ वयोगटातील नागरिकांनाही सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळणार असल्याने बुस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Australia bans social media for children under 16
ऑस्ट्रेलियाचं स्वागतार्ह पाऊल…
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…
Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश

करोना लसीच्या बूस्टर डोससाठीच्या कालावधीत कपात

दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ६ जुलै २०२२ रोजी करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे. आधी दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोससाठी ९ महिने किंवा ३९ आठवडे थांबावं लागत होतं. मात्र, या नव्या निर्णयानुसार दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यात किंवा २६ आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारची सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (NTAGI) केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : करोनाच्या चौथ्या लाटेत लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, “१८ ते ५९ वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना करोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी किंवा २६ आठवड्याने खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस देता येईल.”

“६० वर्षांवरील लाभार्थ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यात येईल,” असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.

सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात ४ कोटी ७५ लाख बुस्टर डोस देण्यात आले आहेत. यात ५७ लाख ७५ हजार आरोग्य कर्मचारी, १ कोटी ५ लाख फ्रंटलाईन वर्कर्स आणि २ कोटी ५० लाख ६० वर्षांवरील वयोगटाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

विश्लेषण : पाच ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी वापरास परवानगी मिळालेली ‘Corbevax’ लस कशी कार्य करते?

भारतात १० जानेवारी २०२२ रोजी बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. यात गंभीर असणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करचा समावेश होता. यावेळी केंद्र सरकारने बुस्टर डोस घेण्यासाठी दुसऱ्या डोसनंतर किमान ९ महिन्यांच्या अंतराची अट ठेवली.

१० एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षांवरील सर्वांसाठी बुस्टर डोस देण्याची घोषणा करण्यात आली. या वयोगटासाठी बुस्टर डोस खासगी लसीकरण केंद्रावर घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यासाठी नागरिकांना शुल्कही आकारण्यात आलं. या काळात १८ ते ४४ वयोगटातील ३३ लाख ९९ हजार नागरिकांनी, तर ४५ ते ५९ वयोगटातील २७ लाख ७६ हजार नागरिकांनी बुस्टर डोस घेतले.

Story img Loader